सातारा : सातारा तालुका पोलिसांनी परळी व माळ्याचीवाडी येथे बेकायदा दारु विक्री करणार्या दारु अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर गुन्हे दाखल केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परळी येथे एका महिलेकडून 840 रुपये किंमतीच्या 12 दारुच्या बाटल्या जप्त केल्या. माळ्याचीवाडी येथील कारवाईत प्रकाश अर्जुन पवार (वय 51, रा. धावडशी ता.सातारा) याच्याकडून 910 रुपये किंमतीच्या 13 दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.