सोमनाथ पवार यांचा उपक्रम आदर्शवत : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 55 गावांना सीसीटीव्हीचे वितरण

by Team Satara Today | published on : 22 July 2025


सातारा : सोमनाथ पवार यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गावांना सीसीटीव्ही सेट देण्याचा केलेला उपक्रम आदर्शवत आहे. त्यांच्या या उपक्रमास आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त जोशी विहीर, तालुका वाई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा मीरा-भाईंदर शहराचे भाजपा सचिव सोमनाथ पवार यांच्या स्वखर्चातून राज्यातील 55 गावांना सीसीटीव्ही सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा भाजपच्या महिला अध्यक्ष सौ. सुरभीताई भोसले-चव्हाण, अनवडी ग्रामपंचायत सरपंच गौतम मोरे, उपसरपंच सुमन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर मधील मुख्य गाव असलेल्या धर्मपेठ, सोलापूर जिल्ह्यातील देवळाली दिवेगव्हाण, धाराशिव जिल्ह्यातील इगोंदा, सांगली जिल्ह्यातील व्हसपेठ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुतारवाडी आचरा, रत्नागिरी जिल्ह्यातील आकले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विरमगाव, बुलढाणा जिल्ह्यातील जांभूळ आजीशपुर सारशीव, अहिल्यानगर जिल्ह्यातील धनेगाव, बीड जिल्ह्यातील शिवणी, धाराशिव जिल्ह्यातील हाफसिंग पिंपळगाव, जालना जिल्ह्यातील पानेगाव, पुणे जिल्ह्यातील पांढरेवाडी, पालघर जिल्ह्यातील नेरोळी, यवतमाळ जिल्ह्यातील खेडबीड यांच्यासह सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील अनवडी, बोपेगाव, बेलमाची, जांब, देगाव, मोहडेकर वाडी, केंजळ, कळंब, शांतिनगर, वाकणवाडी, बदेवाडी, धोम पुनर्वसन, भुईंज, जावळी तालुक्यातील सोनगाव, केडंबे, जरेवाडी, पुनवडी, डांगरेघर, पवारवाडी आनेवाडी, सावरी, बेलोशी, सातारा तालुक्यातील आरेदरे, लिंब, माण तालुक्यातील कुकडवाड, खटाव तालुक्यातील चितळी, बनपुरी, ढोकळवाडी, कलेढोण, पळशी, कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी, बनवडी, जयपूर आणि फलटण तालुक्यातील वडगाव या गावांना सीसीटीव्ही सेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा जिल्ह्याला आतापर्यंत काँग्रेस अथवा राष्ट्रवादीने जेवढी मदत केली नाही त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमनाथ पवार यांनी गावांना सीसीटीव्ही देण्याचा चालवलेला हा उपक्रम खरोखरच आदर्शवत आहे. पवार यांनी फक्त राज्यापुरतेच मर्यादित न राहता बाहेरील राज्यातील गावांनाही मदत केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी मी स्वतःहून सर्वतोपरी मदत करेन.

यावेळी बोलताना सोमनाथ पवार म्हणाले, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून मी गावांना सीसीटीव्ही सेट वाटप करण्याचे ठरवले. त्या माध्यमातून आज राज्यातील 55 खेडेगावांना सीसीटीव्ही सेट भेट म्हणून देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवून मनाला अत्यंत आनंद वाटत आहे. त्यांचे मार्गदर्शन कायमच लाभले आहे. असेच ते भविष्यातही लाभावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अनवडी ग्रामपंचायत माजी सरपंच अंकुश पवार, माजी चेअरमन विलास पवार, माजी व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर पवार, लक्ष्मण पवार, संजय पवार, सागर जाधव, विकास सेवा सोसायटी चे चेअरमन प्रकाश एकनाथ पवार, व्हाईस चेअरमन शिवाजी शिंदे, सचिव पवार, ग्रामसेवक जयंत शिंदे, आदी मान्यवरांसह लाभार्थी खेडेगावांमधील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महारक्तदान संकल्प शिबीराला सातारा, मेढा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढील बातमी
उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या