पत्नीच्या जाचहाट प्रकरणी पतीवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 17 May 2025


सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नीवर संशय घेवून, तसेच शिवीगाळ, मारहाण करत जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. जोया हिदायत शेख (वय 38, सध्या रा. न्यू विकासनगर, सातारा, मूळ रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हिदायत मुनीर शेख (वय 40, रा. न्यू विकासनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 25 फेब्रुवारी 2023 पासून सुरु आहे. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे
पुढील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या