सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच चंद्रकांत ज्ञानू यादव हे त्यांच्या सायकल वरून जात असताना विजय सदाशिव भोसले रा. भोसले मळा, सातारा यांनी त्यांच्या ताब्यातील फॉर्च्यूनर कार क्र. एमएच 12 जेएच 8182 बेदरकारपणे चालवून यादव यांच्या सायकल ला समोरासमोर धडक दिली. या अपघातात यादव हे जखमी झाले असून अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.