जुन्या वादातून क्षेत्रमाहुलीत तरुणाच्या पाठीवर कोयत्याचा वार; अक्षय आढाव याच्याविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : पूर्वीच्या किरकोळ वादातून तरुणाच्या पाठीवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना क्षेत्रमाहुलीतील भैरवनाथ मंदिरामागे घडली. हल्ल्यानंतर शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप असून, याप्रकरणी अक्षय आढाव याच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस मिलिंद बर्गे (वय 26, व्यवसाय डीजे ऑपरेटर, रा. क्षेत्रमाहुली) यांनी फिर्याद दिली. दि. 25 रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बर्गे मंदिराच्या मागे असताना आढाव मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने शर्टच्या पाठीमागे लपविलेला कोयता काढून बर्गे यांच्या पाठीच्या उजव्या बाजूस वार केला.
यानंतर धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मित्रांनी बर्गे यांना सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
पुढील बातमी
रांगेत घुसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मर्ढेत कुटुंबावर लाठी-दांडक्याने हल्ला

संबंधित बातम्या