सातारा : अपघातात जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एकनाथ गबाजी मिसाळ रा. प्रतापसिंहनगर, सातारा यांचा 4 सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.