भारतामध्ये मागील दोन दशकांचा काळ दृष्टीक्षेपात घेतल्यास देशातील बहुतांश राज्य राष्ट्रीय महामार्गांनी जोडली गेलीच, शिवाय अनेक बोगदे आणि उन्नत मार्गांमुळं रस्ते वाहतुकीचा एक नवा अध्याय भारतानं पाहिला. अशा या भारताच्या रस्ते वाहतुकीमध्ये आता आणखी एका नवख्या संकल्पनेची जोड मिळणार असून, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं FASTag संदर्भातील ही नवी योजना नुकतीच सादर केली आहे.
केंद्राकडून सादर करण्यात आलेल्या या योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून, त्याअंतर्गत वार्षिक पास लाँच केला जाणार आहे. वार्षिक पासची ही योजना बंधनकारनक नसून, FASTag ची संपूर्ण प्रणाली आधीप्रमाणं कार्यरत राहील हे लक्षात घ्या. जुन्या प्रणालीनुसार ज्यांना वार्षिक पास घ्यायचा नाही ते आधीप्रमाणंच फास्टॅगनं टोल भरू शकणार आहेत.
वार्षिक पासससाठी कोणती वाहनं पात्र? कोणाला नाही मिळणार हा पास?
फास्टॅगच्या वार्षिक पाससाठी नव्यानं एक अर्ज करावा लागणार आहे. किंवा वाहनधारकांना जुनाच FASTag वापरता येणार आहे. मात्र इथंही काही अटी शर्थी लागू आहेत. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे वाहनाची अधिकृत नोंद VAHAN डेटाबेसमध्ये असावी. FASTag कारच्या किंवा वाहनाच्या विंडशील्डवर असावा आणि वाहनाची नोंद किंवा क्रमांक ब्लॅकलिस्ट यादीत नसावा. कोणत्याही FASTag मध्ये चेसिस क्रमांकाचीच नोंद आहे तर त्यांना वार्षिक पास मिळणार नाही. यासाठी वाहनाची नोंद महत्त्वाची आहे.
खासगी आणि व्यावसायिक वापराबाहेरिल वाहनांमध्ये येणाऱ्या कार, जीप, व्हॅनसाठी वार्षिक पास मान्य केला जाईल. तो सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम FASTag ला VAHAN डेटाबेस वरून वेरिफाय करून घेणं अपेक्षित आहे. जर तिथं कोणतंही वाहन व्यावसायिक कारणासाठी वापरलं जात असेल तर, केंद्रीय मंत्रालयाच्या निर्देशानुसार वाहनाला देण्यात आलेला पासक तातडीनं रद्द केला जाईल.
कुठं वापरता येईल हा वार्षिक पास?
FASTag कडून जारी करण्यात आलेला हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवर अर्थात नॅशनल हायवे आणि नॅशनल एक्सप्रेसवेवरील टोलनाक्यांवर मान्य केला जाईल. राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाद्वारे संचलित राज्य महामार्गांवरील टोलवर वार्षिक पास वापरल्यास त्यासाठीचं शुल्क आकारलं जाईल.
FASTag किती काळ चालणार?
2025-26 साठी 3000 रुपयांच्या वार्षिक पाससाठीचं शुल्क मान्य होताच दोन तासांमध्ये हा वार्षिक पास ACTIVE होईल. हा पास वाहनधारकांना वर्षभर किंवा 200 वेळा केल्या जाणाऱ्या प्रवासांसाठी वापरता येईल. जो कार, जीप किंवा व्हॅनसाठी लागू असेल. मर्यादा पूर्ण होताच हा पास सर्वसामान्य FASTag मध्ये रुपांतरित होईल याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
FAQ
1. FASTag वार्षिक पास म्हणजे काय?
FASTag वार्षिक पास ही भारताच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सादर केलेली एक नवी योजना आहे. याअंतर्गत वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील टोलनाक्यांवर वार्षिक पास घेता येईल. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल.
2. वार्षिक पास घेणे बंधनकारक आहे का?
नाही, वार्षिक पास घेणे बंधनकारक नाही. ज्यांना हा पास घ्यायचा नाही, ते आधीप्रमाणे FASTag द्वारे टोल भरू शकतात.
3. कोणती वाहने वार्षिक पाससाठी पात्र आहेत?
खासगी आणि व्यावसायिक वापराबाहेरील वाहने जसे की कार, जीप आणि व्हॅन वार्षिक पाससाठी पात्र आहेत.