सदरबझारातील वस्तीगृहातून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता; शोधमोहीम सुरू

by Team Satara Today | published on : 15 May 2026


सातारा :  सदरबझार परिसरातील फिनिक्स अकॅडमीच्या मुलींच्या निवासी वस्तीगृहातून एक विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित मुलगी कोणासही न सांगता वस्तीगृहातून निघून गेली असून अद्याप घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

ही घटना दि. १२ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सदर बाजार येथील वस्तीगृहात घडली. याप्रकरणी सतीश दादासो सावंत (वय ४५, रा.  लिंब ता.जि.सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

बेपत्ता झालेली विद्यार्थिनी सानिका सतीश सावंत (रा. लिंब, ता. सातारा) असे तिचे नाव आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील या करीत असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माळेवाडी स्टॉप येथे कुटुंबातील वादातून मारहाणीची घटना; पुतण्याविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात शनिवार पेठेत शिवीगाळ व दमदाटी; गुन्हा दाखल

संबंधित बातम्या