स्टँडअप कॉमेडी करणारा कामराला फडणवीसांनी फटकारले

by Team Satara Today | published on : 24 March 2025


मुंबई :  “स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार ते दाखवून दिलय. कोणाकडे स्वर्गीय हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत आहे. हे जनतेने ठरवलेलं आहे, हे कामराला हे माहित असलं पाहिजे” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराला फटकारलं आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कुणाल कामराला सुणावलं आहे.

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विंडबनात्मक गाणे गात आणि आक्षेपार्ह शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली. या प्रकारामुळे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते राहुल कनाल यांच्याविरुद्ध मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजता पोलिसांनी राहुल कनाललाही ताब्यात घेतले. कुणाल कामराच्या या व्हिडीओवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया देत त्याला खडसावलं आहे.

 “अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे चुकीच तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच. कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत. ते त्यांनी वाचलं असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की स्वातंत्र्यांचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यांवर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही.

कुणाल कामरा जे लाल संविधान दाखवून ट्विट करत आहेत, तेच लाल संविधान राहुल गांधीही दाखवत असतात. ते ना कुणाल कामराने वाचलं आहे ना राहुल गांधी यांनी. असं संविधानाचा फोटो दाखवून तुम्ही तुमची चूक झाकू शकत नाही. संविधानानुसार प्रत्येकाचे स्वातंत्र्य  अबाधित  आहे. पण जर तो इतरांच्या स्वातंत्र्यांवर आक्रमण  करत असेल तर ते योग्य नाही, त्यामुळे राहुल गांधींच संविधान दाखवून तुम्ही कुकर्म करत असाल तर तुम्ही त्यापासून स्वत:ला वाचवू शकत नाही.  असंही फडणवीसांनी बजावलं आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आमिर खानचा संतोष देशमुखांच्या कुटुंबाला धीर
पुढील बातमी
ऑस्करमध्ये भारताला कायम वंचित ठेवलं जाते

संबंधित बातम्या