अपघातांचा धोका....., विकेंडची वाहतूक कोंडी नको रे बाबा....! खंबाटकी घाटाच्या ग्रहणामुळे प्रवाशांची जेजुरी मार्गाला पसंती

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाला वाहतुकीच्या कोंडीचे ग्रहण लागल्यामुळे त्याचा नाहक फटका प्रवाशांना बसत आहे. तीनच दिवसावर नवीन वर्षाचे स्वागत आणि विकेंड आल्यामुळे अपघातांचा धोका टाळण्यासाठी प्रवाशांनी साताराहून पुणे आणि पुण्याहून साताऱ्याकडे येण्यासाठी जेजुरी मार्गाला अधिक पसंती दर्शवली आहे. 

गेल्या सलग चार वर्षापासून पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम चांगलेच रखडले आहे. या रखडलेल्या कामामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून वाहन चालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रखरलेल्या कामामुळे सद्य परिस्थितीत यस आकाराच्या वळणावर केवळ एकाच लेनमधून वाहतूक सुरू आहे. सातारासह जिल्ह्यातील अनेक जण शिक्षण तसेच नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे येथे वास्तव्य करीत आहेत. केवळ तीन दिवसांवर नऊ वर्षाचे स्वागत आणि 

विकेंड आल्यामुळे पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यातून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा वाशसियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र खंबाटकी घाटातील बोगद्याचे अपूर्ण काम, सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या मालिका लक्षात घेता पुण्यावरून सातारा कडे येणाऱ्या आणि साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या सातारा जिल्हावासियांनी हडपसर, दिवेघाट, जेजुरी मार्गे सातारा जिल्ह्यात दाखल होण्यास प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट होत आहे. 




एप्रिलपर्यंत संयम राखावा लागणार....

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापुर टोलनाका परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. काल नाताळच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अत्यंत संथगतीने वाहतूक सुरू होती. काही ठिकाणी तर वाहतूक खोळंबून त्याचा अनेक चलतांना मानसिक त्रास सोसावा लागला. या महिन्यात झालेल्या अधिवेशनामध्ये केंद्रातील सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कामे  एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील असे स्पष्ट केल्यामुळे प्रवाशांना एप्रिलपर्यंत संयम राखावा लागणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा वार्षिक योजनेची कामे तात्काळ पूर्ण करुन निधी खर्च करा : ना. शंभूराज देसाई. निधी खर्च न झाल्यास सबंधित यंत्रणांच्या प्रमुखावर जबाबदारी निश्चित करा
पुढील बातमी
पेन्शनर सिटी झाली आता अतिक्रमणांचे जंजाळ ; अमोल मोहिते पुढाकार घेणार का ? सुज्ञ सातारकरांचा सवाल

संबंधित बातम्या