E20चा वाद आणखी पेटणार! आम आदमी पार्टी करणार सरकारविरोधात आंदोलन, नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 27 July 2026


दिल्ली :  E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर आम आदमी पक्ष (AAP) आता आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. पक्षाने या विषयावर देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून, सरकारने E20 धोरणाचा पुनर्विचार केला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निवेदनासह मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल यांचे आवाहन

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

त्यांनी म्हटले की, देशातील युवकांनी एकत्र येऊन आवाज उठवल्यानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्याचप्रमाणे E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरही नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'E20 इंधन बंद करण्याच्या मागणीसाठी ४ ऑगस्टला वाहतूक संघटनांचा संसदेवर धडक मोर्चा; इथॅनॉलमिश्रित पेट्रोल वाहनधारकांवर लादले जाऊ नये
पुढील बातमी
आमचे लक्ष आहे, तपास वेगाने करा; अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

संबंधित बातम्या