अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा

सातारा : अपघातात एका वृद्धास जखमी केल्याप्रकरणी बस चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शामराव ज्ञानदेव शिंदे रा. वेळे कामठी, ता. सातारा हे फलाट क्र. चार मधून एसटी बस क्र. एमएच 06 एस 8284 मध्ये चढत असताना एसटी बस चालकाने एसटी रिव्हर्स घेत असताना शिंदे हे खाली पडले आणि त्यांच्या पायावरून एसटीचे पुढचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.


मागील बातमी
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या