सैनिक स्कूल परिसरातून साडेसात हजारांचे साहित्य लंपास

by Team Satara Today | published on : 10 July 2026


सातारा : सैनिक स्कूल परिसरातून अज्ञात चोरट्याने साडेसात हजारांचे साहित्य लंपास केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारच्या सुमारास सैनिक स्कूल कॅम्पसमधील नवीन बांधकामाच्या तराली बिल्डिंग मधील तीन फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 7 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
राजवाडा पशुवैद्यकीय रुग्णालयाची जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावरून प्रचंड गदारोळ; सत्ताधारी- विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष

संबंधित बातम्या