मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणूक आयोगाने देखील जिल्हानिहाय अहवाल मागवला असल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. काही जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असून जागावाटप संदर्भात पक्षश्रेष्ठी चर्चा करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये भाजप राज्यामध्ये 160 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
महायुतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यांमध्ये आली आहे. आज (दि.19) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागावाटप संदर्भात चर्चा करणार आहेत. दरम्यान महायुतीमध्ये भाजपचा सर्वाधिक जागांवर दावा असून भाजपचं महायुतीचा मोठा भाऊ म्हणून काम करत आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार, विधानसभेसाठी भाजप 160 जागांवर उमेदवार देणार आहे. याबाबत नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत. निवडणूकीची तयारी सुरु करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
यापूर्वीच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे जागावाटप संदर्भात चर्चा केली होती. यावेळी भाजपने 160-170 जागांचा पेक्षा कमी लढू नये, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्याचबरोबर अजित पवार गट व शिंदे गट देखील 90 ते 100 जागांची मागणी करत होते. याबाबत मंत्री छगन भुजबळ आणि शिंदे गटातील रामदास कदमांनी वक्तव्य केलं होतं. आता मात्र भाजप 160 जागांवर लढणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.
राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूका लागतील असे देखील म्हटले जात आहे. राज्यामध्ये नवीन सरकार 28 नोव्हेंबर पूर्वी निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांचे सर्व टप्पे हे 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान घेतले जातील अशी माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये उशीरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेसाठी काळजी घेतली जात आहे. कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवस मॅरेथॉन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून येत्या 23 व 24 सप्टेंबरला ही बैठक पार पडणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |