सातारा : शहरातील करंजे नाका परिसरातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाणे येथे मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी कमलाकर भोसले (वय २०, रा. करंजे नाका, सातारा) ही दि. १५ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास “कॉलेजला जाते” असे सांगून गेंडामाळा कब्रस्तान समोरील राहत्या घरातून बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी सातारा शहर परिसरात तिचा शोध घेतला. नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात आली, परंतु तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
तिच्या मोबाईल क्रमांकावर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद लागत असल्याचे समोर आले. अखेर याबाबत गोरख पंचम भोसले (वय ५६, रा. रिद्धी सिद्धी संकुल, म्हसवे रोड, जाधव कॉलनी, करंजे नाका, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार इंगुळकर करीत नागरिकांनी संबंधित तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.