म्हाडाच्या 13395 घरांची विक्री

अवघ्या 15 लाखांत घ्या 1 BHK फ्लॅट

by Team Satara Today | published on : 09 May 2025


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या एकात्मिक कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत 13395 घरांच्या विक्रीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एक स्वतंत्र वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत विक्री करण्यात येणार आहेत.

म्हाडाच्या या कोकण मंडळाच्या लॉटरीतील 13395 घरे ही विरारमधील बोळींज, ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, गोठेघर, खोणी आणि भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पांमधील घरांचा समावेश आहे. या घरांची किंमत 15 लाखांपासून सुरू होत आहे. सर्वात स्वस्त घरे ही शिरढोण, कल्याण परिसरात आहेत. या घरांच्या किमती 14 लाख 96 हजार 930 रुपयांपासून सुरू होत आहेत. विरार - बोळींज येथील घरांच्या किमती 23 लाख 28 हजार 566 रुपयांपासून सुरू होत आहेत. bookmyhome.mhada.gov.in वेबसाईटला भेट देऊन तुम्ही सर्व प्रकल्प आणि घरांच्या किमती याबाबत अधिक माहिती मिळवू शकता.

'बुक माय होम' वेबसाईट अर्जदारास 'मजला' व 'सदनिका' स्वतःच्या पसंतीनुसार निवडण्याची मुभा देते. या वेबसाईटवर कोकण मंडळाच्या विरार-बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजच https://bookmyhome.mhada.gov.in या वेबसाईटवर अर्ज नोंदणी करा आणि आपल्या पसंतीचे हक्काचे घर निवडा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कासेगाव युवक खून प्रकरणी अपहरणासाठी वापरलेल्या गाड्या ताब्यात
पुढील बातमी
मुंबईतील टाटा हॉस्पिटल धमकीचा मेल

संबंधित बातम्या