सातारा : मत्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचा निषेधार्थ उद्या शनिवार दि. 8 मार्च रोजी सातारा जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने पोवईनाका येथील शिवतीर्थ याठिकाणी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा यांनी केले आहे.
मत्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर व अमानुष हत्या यासाठी दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे. तसेच महाराष्ट्रात थोर महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान यासाठी सुद्धा शासनाने कडक कायदा पारित करणे गरजेचे आहे.
तसेच राज्यातल्या विविध जिल्ह्यांत वाढते महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अश्या घटना सुद्धा वारंवार घडत आहेत. या घटना रोखण्यात महाराष्ट्र राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यासाठी सुद्धा शासनाने योग्य ती माहिती घेऊन संबंधित गुन्हेगारांवर कडक शासन करावे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, वारंवार होणारा महापुरुषांचा अवमान, वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना अशा घटनाच्या निषेधार्थ उद्या दि. शनिवार 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी जास्तीत जास्त महिला वर्गांनी सुद्धा शिवतीर्थ पोवई नाका येथे उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.