स्वच्छ साताऱ्यासाठी नऊ एमआरएफ सेंटर उभारणी; घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचे याशनी नागराजन यांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 20 February 2026


सातारा  : स्वच्छ सातारा जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नऊ ठिकाणी एमआरएफ (Material Recovery Facility) सेंटरची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

सातारा जिल्हा परिषद येथे स्थायी सभागृह येथे एम आर एफ तालुका स्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प गावांचे कार्यान्वयन व संचालन बाबत सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी, विस्ताराधिकारी, बीआरसी व गटविकास अधिकारी व उपाभियंता यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट सेंटर फॉर एनवोर्मेन्ट एज्युकेशन(CEE) दिल्लीचे वरिष्ठ कार्यक्रम संचालक प्रभोजीत सोधी,  प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, कार्यकारी अभियंता गौरव चक्के, खंडाळाचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, कराडचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटीलर उपस्थित होते. 

तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाचे उत्कृष्ट बिझनेस मॉडेल विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कुटुंब पातळीवर कचरा वर्गीकरणाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्याचे घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभे करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंटच्या सेंटर फॉर एनवोर्मेंट एज्युकेशन (CEE) संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम संचालक प्रभज्योत सोधी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ओला कचरा दररोज आणि सुका कचरा तीन दिवसांतून एकदा संकलित करण्यात यावा. ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने असावीत. दररोज 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी स्वतःच्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतः करणे बंधनकारक राहील.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवसायाधारित मॉडेल विकसित करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एमआरएफ सेंटरची उभारणी करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन सीईई संस्थेमार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर प्रकल्पांनाही अशाच प्रकारे मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असून सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास जिल्ह्यात स्वच्छतेचे आदर्श मॉडेल निर्माण होऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

होते.तालुकास्तरीय प्लास्टिक केंद्र निवड केलेल्या ग्रामपंचायती मल्हार पेठ, तरडगाव, पाचवड, पुसेगाव, वाठार स्टेशन, मंदृळकोळे, वर्णे,पांगरी, मसूर या गावांचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, संबंधित तालुक्याचे सर्व विस्तार अधिकारी बि आर सी, यावेळी CEE चे जिल्हा समन्व्यक आकाश गायकवाड पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा तज्ञ  उपस्थित होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यवतेश्वर येथील प्रमोद लॉजवर अल्पवयीन युवतीवर अत्याचार; युवकावर पोस्को कलमांतर्गत सातारा तालुका पोलिसांत गुन्हा
पुढील बातमी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसस्थानकाचे आऊट गेट पुढे काढा - ना. शिवेंद्रसिंहराजे; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

संबंधित बातम्या