सातारा : अपार्टमेंटच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विक्रम सतीश घाडगे (रा. केसरकर पेठ, सातारा) यांची अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी क्र. एमएच 11 एएस 4555 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.