अपघाती मृत्यू

by Team Satara Today | published on : 18 June 2025


सातारा : एकाचा उचकी लागल्याने अपघाती मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय दत्तात्रय सुतार (वय 30, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) हा युवक दि. 17 जून रोजी आंबेदरे येथे टेकडीवर कांदा कापत होता. त्यावेळी त्याला दोनवेळा उचकी लागली. यादरम्यान तो बेशुध्द झाला. यामुळे त्याला शाहूपुरीतील खासगी रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरनी सिव्हीलमध्ये नेण्यास सांगितले. अक्षय याला सिव्हीलमध्ये नेले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता
पुढील बातमी
अज्ञात दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी

संबंधित बातम्या