साताऱ्यात रविवारी रंगणार जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा थरार

संयोजन समितीचे अध्यक्ष उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर यांची माहिती

by Team Satara Today | published on : 12 September 2025


सातारा, दि. १२ :  सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या मॅरेथॉनचे हे १४ वे वर्ष असून या मॅरेथॉनचा प्रारंभ रविवारी सकाळी ६.३० वाजता पोलिस परेड ग्राऊंड येथून होणार असून, सर्व स्पर्धकांनी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पोलिस परेड ग्राउंडवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या मॅरेथॉनचा शुभारंभ सातारचे खासदार उदयनराजे भोसले व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक असलेले जय बालाजी ग्रुपचे (JBG Group) संचालक श्री गौरव जजोदिया, मालाज ग्रुपचे हुसेन माला तसेच जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री तुषार दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे व सेक्रेटरी शैलेश ढवळीकर यांनी संयुक्तरीत्या दिली.

मॅरेथॉन मार्गावर आठ ठिकाणी मदत केंद्रे  : या मॅरेथॉनची सुरुवात पोलिस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर पारंगे चौक, पोवई नाका, नगरपरिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर चौक, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या ५०० मीटर पुढे जाऊन त्याच मार्गाने परत येऊन पोलिस परेड ग्राउंड येथे मॅरेथॉनची सांगता होईल अशी माहिती रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे यांनी दिली. या मॅरेथॉन मार्गावर आठ ठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात आली असून त्याचबरोबर चिअरिंग टीम देखील असणार आहेत. संपूर्ण मॅरेथॉन मार्गावर पाण्याच्या कॅनची जबाबदारी डॉ सुचित्रा काटे, डॉ अश्विनी देव व डॉ रंजिता गोळे यांच्याकडे आहे अशी माहिती सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने संस्थापक संचालक सर्वर्श्री ॲड कमलेश पिसाळ, डॉ चंद्रशेखर घोरपडे आणि सीए विठ्ठल जाधव यांनी दिली. 

वैद्यकीय मदत तात्काळ : पारंगे चौक ते सैनिक सहकारी बँक या दरम्यान डॉ पल्लवी पिसाळ व डॉ सुनील फडतरे यांच्याकडे वैद्यकीय मदतीची जबाबदारी असून त्यांना रायगाव येथील छाबडा कॉलेजची टीम मदत करणार आहे. तर पारंगे चौक ते पोलीस परेड ग्राउंड दरम्यान वैद्यकीय मदत तात्काळ करण्यासाठी मेडिकल डायरेक्टर डॉ प्रतापराव गोळे हे स्वतः आणि त्यांची टीम सज्ज आहे. तिथे छाबडा कॉलेज ऑफ फ़िजिओथेरपि व ढाणे इंजिनीअरिंग क्लासची टीम असणार आहे. तिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील त्यांना मदत करणार आहेत.

योग्य ठिकाणी ट्रॅफिक कोनचे नियोजन : मॅरेथॉनच्या नियोजनामध्ये संपूर्ण घाटात योग्य वेळी व योग्य ठिकाणी ट्रॅफिक कोनचे नियोजन करणे ही जबाबदारी शैलेश ढवळीकर, भास्कर पाटील, दिनेश उधाणी, डॉ राजेश शिंदे, प्रफुल्ल पंडित, डॉ अजय शेडगे तसेच कैलास बागल सरांचा सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप, रवींद्र भणगे मित्र समूह, १३ भवानी ग्रुप, माहेश्वरी संघटन, श्रीनिधी पतसंस्था, हिंदवी पब्लिक स्कूल, आयडीबीआय बँकेचा सुसंवाद ग्रुप, अनंत इंग्लिश स्कूल टेक्निकल बॅच, कॉम्प्युटर मिडिया डिलर्स असोसिएशन हे कोन व्यवस्थापन करणार आहेत. तसेच स्पर्धेच्या मार्गाचे मोजमाप करणे ही जबाबदारी रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे, डॉ अजय शेडगे, डॉ विकास पाटील, डॉ राजेश शिंदे, दिनेश उधाणी आणि भास्कर पाटील यांनी घेतली आहे.

इमर्जन्सी आरोग्य सेवा : मॅरेथॉनचे वैद्यकीय संचालक डॉ प्रतापराव गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली इमर्जन्सी कार्डियाक रेसिसिटेशनचे (CPR) प्रशिक्षण घेतलेले संयोजन समितीमधील सदस्य तसेच शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे विद्यार्थी तैनात करण्यात आले आहेत. यावर्षीच्या मॅरेथॉनचे मेडिकल पार्टनर “पल्स हॉस्पिटल” हे असणार आहेत. तसेच मॅरेथॉन मार्गावर ऑटोमटिक इलेक्ट्रिक डिफ्यब्यूलेटरची (AED) व्यवस्था असून, ६ कार्डियाक ॲम्ब्युलन्स, ६ साध्या ॲम्ब्युलन्स, चार टू व्हिलर ॲम्बुलन्स त्याचबरोबर AED मशीनदेखील तैनात करण्यात आल्या असून प्रत्येक ॲम्बुलन्सबरोबर एक फिजिशिअन व दोन डॉक्टर्स असणार आहेत. त्याचबरोबर फिजिओथेरिपिस्ट डॉ स्वप्ना शेडगे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड येथील टीमदेखील तैनात असणार आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा भूलतज्ञ संघटनेचे सर्व डॉक्टर्स डॉ अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज असणार आहेत.

नियोजन अंतिम टप्प्यात : मॅरेथॉनचा एक्स्पो व पोलीस परेड ग्राउंड येथील तयारीसाठी आर्किटेक्ट सुधीर शिंदे व अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित हे गेल्या महिन्यापासून तयारी करीत असून स्टॉल, स्टेज व स्पर्धकांसाठी लाईनअप सुविधा यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. स्पर्धकांना मेडल देण्याची जबाबदारी सर्वार्थ टीम, डॉ देवदत्त देव, डॉ अविनाश शिंदे, शैलेश ढवळीकर, राहुल घायताडे, डॉ सुधीर पवार, जयंत शिवदे यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील ही जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच स्पर्धकांसाठी पाणी, एनर्जी ड्रिंक्स श्री इर्शाद बागवान तर अल्पोपहार व्यवस्था संग्राम कदम हे सांभाळणार आहेत. मॅरेथॉन मार्गावरील खड्डे मुजवणे, रस्त्यांची डागडुजी व स्वच्छतेची जबाबदारी सातारा नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून, मॅरेथॉनदरम्यान विद्युत व्यवस्थापनाची जबाबदारी ही मंगेश वाडेकर हे पाहत असून एक्स्पो व मॅरेथॉनच्या ठिकाणी सर्व तयारी ही पूर्णत्वास आली आहे. तसेच मॅरेथॉन संपल्यानंतर कुठेही कचरा रहाणार नाही याचीदेखील द‍क्षता घेण्यात आली आहे.

ग्राउंडवरील पाण्याची जबाबदारी : १०० केपी बॅगेज काउंटर सूर्यप्रभा हॉस्पिटल, रिकव्हरी सपोर्ट मीनाक्षी हॉस्पिटल, ग्राउंडवरील पाण्याची जबाबदारी इर्शाद बागवान आणि निरंजन पिसे, तर सर्व स्पर्धकांना पदक वितरण करणे सर्वार्थ टीम, तसेच डॉ देवदत्त देव, डॉ अविनाश शिंदे, शैलेश ढवळीकर, राहुल घायताडे, डॉ सुधीर पवार, जयंत शिवदे यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, तर स्पर्धा मार्गावरील हेल्मेटधारी पायलट म्हणून डॉ चंद्रशेखर घोरपडे, ॲड कमलेश पिसाळ, डॉ प्रतापराव गोळे आणि राहुल घायताडे हे त्यांच्या पायलट बुलेटचे सारथ्य करणार आहेत. मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे हे साताऱ्यातील उत्कृष्ट मॅरेथॉन धावपटू असून त्यांनी आजवर अनेक मॅरेथॉन स्पर्धा अतिशय कमी वेळात पूर्ण केल्या आहेत. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत.

प्रशासकीय सेवांची बांधणी  : संपूर्ण देशभरात नावाजल्या गेलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रशासन, पोलिस वाहतूक नियंत्रण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपरिषद, जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा वन विभाग आणि एस.टी महामंडळ इत्यादी यांनी प्रशासकीय सेवांची बांधणी केली आहे.

सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटनाचे मोलाचे योगदान : ही मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी या वर्षीचे मेडीकल पार्टनर "पल्स हॉस्पिटल", तसेच मीनाक्षी हॉस्पिटल, सावकार इंजिनीरिंग कॉलेज, सूर्यप्रभा हॉस्पिटल, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, (सातारा), कराड येथील कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे फिजिओथेरपी कॉलेज, रायगाव येथील छाबडा कॉलेज फिजिओथेरपी, महाराजा ग्रुप, छाबडा कॉलेज होमिओपथि, जेष्ठ नागरिक संघ, ढाणे मेघा इंजिनीरिंग क्लासेस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पोदार इंटरनॅशनल स्कूल, रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प व विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटनाचे आत्यंतिक मोलाचे योगदान या मॅरेथॉन लाभले आहे. त्याचबरोबर सर्व सातारकरांनी तसेच यवतेश्वर व सांबरवाडी येथील ग्रामस्थांनीदेखील जोरात तयारी केली असून येणाऱ्या पाहुण्यांची उत्तम व्यवस्था होण्यासाठी व स्पर्धेच्या नियोजनात मदत करण्यासाठी अतिशय महत्वाचे योगदान देऊ केले आहे. प्रमुख अतिथी आणि प्रायोजक यांच्या स्वागताची जबाबदारी अध्यक्षा डॉ चंद्रशेखर घोरपडे, ॲड कमलेश पिसाळ, निशांत गवळी, जितेंद्र भोसले, सीए विठ्ठल जाधव, अभिषेक भंडारी यांच्यावर आहे.

बक्षीस वितरण समारंभ : पोलीस परेड ग्राउंड येथील व्यासपीठ आणि स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाची जबाबदारी सीएस नेहा दोशी आणि सचिन मांढरे, अध्यक्ष आर्किटेकट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सचिव शैलेश ढवळीकर, खजिनदार राहुल घायताडे, डॉ पल्लवी पिसाळ, निशांत गवळी, शिल्पा जाधव यांच्यावर आहे. तर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची जबाबदारी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ संदीप काटे, रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे, जॉईंट रेस डायरेक्टर डॉ दीपक बनकर, डॉ सुधीर पवार यांच्याकडे आहे, तर ज्यांनी ५ वेळा ही स्पर्धा पूर्ण केली आहे, अशा स्पर्धकांचे निकाल जाहीर करण्याची जबाबदारी श्री कृष्णा सोनमळे आणि सागर निंबाळकर यांच्याकडे आहे. तर दिपप्रज्वलन जबाबदारी अध्यक्ष उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे यांच्यावर तर फूड पॅकेट वितरणाची जबाबदारी संग्राम कदम, निरंजन पिसे, खजिनदार राहुल घायताडे यांच्यावर आहे.

OTT प्लॅटफॉर्मवर मॅरेथॉनचे थेट प्रक्षेपण : रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे यांनी सांगितले की या वर्षी प्रथमच Fancode या OTT प्लॅटफॉर्मवर या मॅरेथॉनचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे आपली मॅरेथॉन ही जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे. या Fancode साठी बाईक रायडर म्हणून श्री नितीन किरवे, रोहित शहा आणि प्रफुल्ल पंडित हे असणार आहेत. Fancode समन्वयक श्री गिरीश साठे, समालोचक श्री अमेय भागवत व समन्वर इरा कमलेश पिसाळ यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

मुख्य प्रायोजक जय बालाजी ग्रुप ; या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक जय बालाजी ग्रुप आहेत, पॉवर्ड बाय मालाज, तर “मिडिया पार्टनर” म्हणून “झी २४ तास” ही वृत्तवाहिनी असणार आहे. तर फोटोग्राफी पार्टनर म्हणून One Glint हे असणार आहेत. त्याचबरोबर दरवर्षी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अशी तीन प्रकारची मेडल्स आपण देत असतो, त्यासाठी गन टायमिंग हे प्रमाण धरले जात होते, परंतु, यावर्षी मेडल्ससाठी "चीप टायमिंग" हे प्रमाण धरले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पाहुण्यांना सातारकरांनी प्रोत्साहन द्यावे : या उपक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात दाखल होणाऱ्या आपल्या पाहुण्यांना सातारकरांनी प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांना मदत करून ऐतिहासिक सातारा नगरीचा लौकिक वाढवण्यामध्ये सातारा रनर्स फौंडेशनच्या सर्व संचालकांच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काटे, रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे व सचिव शैलेश ढवळीकर यांनी संयुक्तरीत्या केले आहे.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सकाळी ८.३० वाजता  :  समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून श्री शंभूराज देसाई (पर्यटन व खाणकाम मंत्री महाराष्ट्र) तसेच श्री मकरंद आबा पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र) तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री महेश शिंदे हे उपस्थित रहाणार आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा सातारकरांचा अभिमान
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यातील खुले करण्यात आलेले पाणंद रस्ते जीआयएस नकाशावर

संबंधित बातम्या