जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणूक; उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे - पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 15 August 2026


सातारा  :  सातारा जिल्हा हा उद्योजकांसाठी सुरक्षित आहे. तरी उद्योजकांनी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी. त्यांच्या पाठीशी शासनासह प्रशासन खंबीरपणे उभे आहे, अशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

हॉटेल फर्न रेसिडेन्सी,  सातारा येथे पालकमंत्री श्री. देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा उ‌द्योग केंद्राचे सहायक आयुक्त उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात नवनवीन उद्योग यावे यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सातारा, तासवडे, खंडाळा या ठिकाणी मोठे उद्योग आहेत. येथील उद्योगजकांना काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. 

नागरिकांच्या हाताला काम देणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचे ध्येय आहे. उद्योजकांनी सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करावी - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक युवा पिढीला ऊर्जा, प्रेरणा देणारे ठरेल - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्मारकाचे लोकार्पण उत्साहात

संबंधित बातम्या