मुंबई : दक्षिण कोकणापासून गोव्यापर्यंत वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहणार असून, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल. समुद्र खवळलेला असल्यानं किनारपट्टी भागांमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम स्वरुपातील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, या धर्तीवर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरातील घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक अहिल्यानगर इथंही पावसाच्या तुरळक सरींची हजेरी असेल असा अंदाज आहे.
मुंबई आणि उपनगरांमधील हवामानाचा अंदाज घ्यायचा झाल्यास सोमवारी सायंकाळनंतर शहराच्या किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुढील 24 तासांमध्येसुद्धा हे चित्र कायम राहणार असून, सागरी वाऱ्यांचा बहुतांशी परिणाम शहरातील हवामानावर होताना दिसणार आहे. ज्यामुळं हवेत काहीसा कारवा, ढगाळ वातावरण असं एकंदर चित्र पाहायला मिळेल. शहरालगतच्या उपनगरीय भागांमध्येसुद्धा हीच स्थिती कायम असून चक्रीवादळाचे थोडेथोडके परिणाम इथं कोसळधारीच्या स्वरुपात दिसून येतील. ज्यामुळं नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, तर मासेमारांनी समुद्र खवळल्यानं मासेमारीसाठी जाऊ नये असा सतर्कतेचा इशाराही जारी करण्यात आला आहे.
दक्षिण कोकणापासून गोव्यापर्यंतच्या किनारपट्टी भागांमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. येथे वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहणार असून, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने मासेमारांना समुद्रात जाण्यापासून सावध केले आहे.
पुढील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर येथे तुरळक सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे सागरी वाऱ्यांच्या प्रभावामुळे होईल.