हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी

by Team Satara Today | published on : 19 August 2025


कुल्लू  : हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू येथे ढगफुटी झाली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान कुल्लू यथे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.

कुल्लू येथे ढगफुटी झाली आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत तीन दुकाने, एक पूल वाहून गेले आहेत. ही घटना कुल्लूच्या कनौन गावाजवळ घडली आहे. अचानक या ठिकाणी ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रचंड वेग पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.

ही घटना घडताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्य करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. भारतीय हवामान विभागाने आज कुल्लूला यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पाऊस केवळ कुल्लूपुरता मर्यादीतनही. पूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या आपत्तीनंतर काही दिवसांनीच कठुआमध्ये देखील ढगफुटीची घटना घडली आहे. जिल्ह्यातील जोड भागात झालेल्या या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, जंगलोट परिसरात ढगफुटीची माहिती मिळताच त्यांनी कठुआचे एसएसपी शोभित सक्सेना यांच्याशी संपर्क साधला. या आपत्तीत मृत व्यक्तींचा समावेश आहे. रेल्वे ट्रॅक, राष्ट्रीय महामार्ग आणि कठुआ पोलिस स्टेशन देखील प्रभावित झाले आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्येही ढगफुटीची घटना घडली होती, त्या दुर्घटनेत आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा सतत वाढत आहे.

नागरी प्रशासन, सैन्य आणि निमलष्करी दलांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. ढगफुटीमुळे जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग ढिगाऱ्याखाली आला आहे. या महामार्गाचा एक पाईप बंद करण्यात आला आहे, तर नुकसानीचा अंदाज लावणे सध्या कठीण आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून, प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासुर्वेत हुतात्मा प्रवीण वायदंडेंना निरोप
पुढील बातमी
उरमोडी धरणासाठी 3042 कोटींच्या कामांना मंजुरी

संबंधित बातम्या