सातारा शहर परिसरातील गोडोली नाका, सदरबझार परिसरात जुगार अड्यावर छापा

by Team Satara Today | published on : 15 February 2026


सातारा  : सातारा शहर परिसरातील गोडोली नाका आणि सदरबझार परिसरात विनापरवाना सुरु असणाऱ्या जुगार अड्यावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे १८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी जाफर शहाबुद्दीन सय्यद (रा. उडतारे, ता. वाई, जि. सातारा) व आशपाक गुलाब शेख (रा. भिमाबाई आंबेडकरनगर, सातारा) यांना ताब्यात घेतले आहे.

जाफर सय्यद याचा गोडोली नाका ते पोवई नाका जाणाऱ्या रोडवर असलेल्या चिकन दुकानाच्या आडोशाला तर आशपाक शेख याच्या सदरबझार परिसरातील एका चिकन दुकानाच्या आडोशाला सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ही कारवाई केली. पोलिस कर्मचारी वैभव माने आणि सुहास कदम हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवथर येथून डीपीतील २४ हजार रुपये किमतीची ८० किलो तांब्याची तार लंपास
पुढील बातमी
सातारा जिल्हा कारागृहात बंदीवानाकडून शिवीगाळ, दमदाटी; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

संबंधित बातम्या