सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ राजू सर्जेराव शेळके यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी रविवार पेठेतील भाजी मंडईत दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ राजू सर्जेराव शेळके रा. जावळवाडी, पोस्ट वेणेगाव, ता. सातारा यांना कापून टाकीन, गोळ्या घालीन, अशी धमकी दिल्या प्रकरणी रोहित जगन्नाथ नाईक, जगन्नाथ नाईक, सुनिता जगन्नाथ नाईक, राकेश जगन्नाथ नाईक सर्व रा. खेड, सातारा तसेच दोन अनोळखी इसमांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.
त्या धमकी प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव-सातारा रस्त्यावर परफेक्ट कंपनीजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
December 03, 2025
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध
December 03, 2025
कला व वाणिज्य महाविद्यालयात एड्स दिनानिमित्त जागरूकता अभियान
December 02, 2025
कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी मिळणार अनुदान
December 02, 2025