दिल्ली : दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये डबल मर्डरची भयंकर घटना समोर आली आहे. बुधवारी आई आणि मुलाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे घरात काम करणाऱ्या नोकराने ही हत्या केली. महिलेचा पती कुलदीप घराबाहेर गेलेला असताना ही घटना घडली. घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने पोलिसांना बोलावण्यात आलं.
दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, महिलेचे पती आणि पोलीस पथकाने घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना धक्का बसला. महिलेचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला, तर मुलाचा मृतदेह वॉशरूममधून सापडला. रुचिका (४२) असं महिलेचं नाव आहे, तर मुलाचं नाव क्रिश (१४) आहे. पतीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोहोचले.
महिलेचा पती कुलदीप जेव्हा त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की घराचा दरवाजा बंद होता आणि पायऱ्यांवरून रक्ताचे थेंब होते. त्यानंतर त्याने बुधवारी रात्री ९.४० वाजता पोलिसांना फोन केला.
घरात काम करणाऱ्या नोकराला पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत नोकराने सांगितलं की मालकिणीने त्याला शिवीगाळ केली होती, म्हणून त्याने दोघांची हत्या केली. नोकर मुकेश हा बिहारचा रहिवासी आहे. तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा आणि कपड्यांच्या दुकानात मदतनीस म्हणून काम करायचा.