सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्किट हाऊस येथील आढावा बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा संपर्क अध्यक्ष गणेश सातपुते, वरणजीत शिरोळे तसेच जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुके आणि विधानसभा मतदारसंघांतील संघटनात्मक पदांची स्थिती तपासण्यात आली. रिक्त पदांवर लवकरच नियुक्त्या करून पक्षाची रचना अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बूथस्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी पक्षाचे विचार अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासोबतच स्थानिक प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.