कमला मिल परिसरातील टाईम्स टॉव्हरमध्ये भीषण आग 

by Team Satara Today | published on : 06 September 2024


मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरातील एका इमारतील भीषण आग लागली आहे. कमला मिल परिसरातील टाईम्स टॉव्हरमध्ये आग लागली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी 6.30 वाजता टाईम्स टॉव्हरला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थाळी दाखल झाल्या आहेत. पण आग भीषण असल्यामुळे आणखी 3 अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. एकूण सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आग नक्की कशामुळे लागला यामागील कारण अस्पष्ट आहे. टाईम्स टॉव्हर कमर्शियल टॉव्हर असल्यामुळे रात्री कोणतेही कर्मचारी याठिकाणी नव्हते म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. आगीत कोणतीही जीवतहानी झालेली नसल्याची माहिती देखील अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

आग इतकी भीषण आहे की, काचेचं टॉव्हर असल्यामुळे काचा आणि काही सामान खाली कोसळलं. घटनास्थळी मुंबई पोलीस आणि रुग्णवाहिका देखील दाखल झाली होती. शर्थिच्या प्रयत्नांनंतर मुंबईच्या लोअर परळ परिसरातील इमारतीत लागलेली आग नियंत्रणात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुण्यातील एका गणेश मंडळाने साकारलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यावरुन वाद
पुढील बातमी
अमेरिकेकडून युक्रेनला होणाऱ्या मदतीमुळे अमेरिका-रशिया संबंधात आणखी तणाव वाढेल

संबंधित बातम्या