सातारा : कर्जाच्या आमिषाने 37 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 एप्रिल 2025 रोजी रोहित बाजीराव दुटाळ रा. रायगाव, ता. जावली, जि. सातारा यांना व्यवसायासाठी ऑनलाईन कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून डुटाळ यांच्याकडील मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड घेऊन त्यांची 37 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहम्मद भालदार, यास्मिन मोहम्मद भालदार दोघे रा. कल्याण मुंबई, आरती शंतनु कुलकर्णी रा. समर्थ मंदिर, सातारा आणि सुरज राजेंद्र कणसे रा. फडतरवाडी, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.