02:06pm | Jan 27, 2025 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर शेजारीच नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याच्या प्रकल्पाला गती आली आहे. महाबळेश्वर गिरीस्थान क्षेत्रातील पर्यटनाचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाचा घाट घातला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या प्रकल्पाचा प्रारूप विकास आराखडा हरकतींसह जाहीर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ८०९ कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाचे काम शंभर दिवसाच्या उद्दिष्टानुसार वेगाने सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाने गती घेतली आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे. ६१३ हरकतींच्या विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये बाजे (ता. पाटण) येथे ०.४५ किलोमीटर ते २ किलोमीटर अंतराचे छोटे विमानतळ व उरमोडी येथे दोन किलोमीटर लांबीची सी प्लेन धावपट्टी तयार केली जाणार आहे. तापोळा येथे सुद्धा सी प्लेन उतरवण्याची सुविधा करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजे येथील पोर्ट विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहज पोहोचणे शक्य होणार आहे. याशिवाय बामनोली ठोसेघर, कास पठार या भागाचाही पर्यटकांना आनंद घेण्यास शक्य आहे.
इको टूरिझम पर्यटनाला चालना मिळेल या दृष्टीने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये टुरिस्ट पॅराडाईज, सायकल ट्रॅक छोटी विमानतळे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. या विविध सोयी सुविधांसाठी तब्बल १२ हजार ८०९ कोटी रुपये खर्च येणार आहे.
या कामासाठी राज्य शासनाने विविध कंपन्यांची निविदा प्रक्रिया राबवली असून, पुढील टप्प्यांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. याशिवाय खगोल प्रेमींसाठी डार्क स्काय पार्क रेट्रो विलेज म्हणजे आकाशातील तारे स्पष्टपणे पाहण्यासाठी पाटण तालुक्यातील अरळ व काठी या भागात डार्क स्काय पार्क या ठिकाणी खगोल प्रेमींना टेंट उभारून त्यात आकाश न्याहाळता येणार आहे.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
महिलांच्या विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
पन्हाळा परिसरातून आवळल्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील तीन जणांच्या मुसक्या |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
मंगळवार पेठेत साठ हजारांची घरफोडी |
देऊर येथील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी |
कोंडवे येथील गोळीबार प्रकरणातील एकास अटक |
बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करणारे पाचजण ताब्यात |