काशीळ : येथील काशीळ स्टॅन्ड जिल्हा परिषद शाळेत मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत माने, उपाध्यक्ष प्रफुल्ल जाधव तसेच सर्व सदस्य, मुख्याध्यापिका सौ.वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.अंजली खंडाईत, सौ. शुभांगी लादे, सौ. विजया कांबळे श्रीअमित माने हे सर्व उपशिक्षक तसेच पालक वर्ग उपस्थित होता. माता पिता पालकांचे पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी उत्साहात करण्यात आले.
सौ.खंडाईत यांनी मनोगत व्यक्त करून मातृ पितृ दिनाचे महत्त्व विशद केले.पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून भारतीय संस्कृती जपणारा हा उपक्रम आहे ; अशा भावना व्यक्त केल्या.मुलांच्या जीवनात पालकांच्या निस्वार्थ योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.भारतात, १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डेला पर्याय म्हणून 'मातृ-पितृ पूजन दिवस' म्हणून साजरा केला जातो.
मातृपितृ दिनाचे महत्त्व म्हणजे पालकांचा सन्मान, आई-वडिलांच्या त्याग, समर्पण आणि प्रेमाला आदरांजली वाहणे होय. भारतीय संस्कृती 'मातृ देवो भव, पितृ देवो भव' या भारतीय मूल्यांचा प्रसार करणे.पिढ्यांमधील दरी कमी करणे आणि कुटुंबातील प्रेम व आदर वाढवण्याचा प्रयत्न केला जातो . या दिवशी मुले आपल्या आई-वडिलांचे औक्षण करून, हार घालून आशीर्वाद घेतात. शाळा व्यवस्थापन समितीने असेच उपक्रम शाळेने वेळोवेळी आयोजित करावेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या आणि या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.