सातारा : सातारा बसस्थानक परिसरातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या अंगावरील सुमारे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत शितल गणेश फडतरे (वय 30, रा. नागनाथ, ता. खटाव) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
13 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शितल फडतरे बसस्थानक परिसरात असताना गर्दीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावरील दागिने लबाडीने काढून घेतले. काही वेळाने दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार पाटोळे करीत आहेत.
सातारा बसस्थानक परिसरात गर्दीत महिलेच्या अंगावरील 60 हजारांचे दागिने लंपास
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा