सातारा : सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटामध्ये बुधवारी दरड कोसळली. दरड कोसळत असताना या ठिकाणी कुठलेही वाहन आले नसल्याने जीवितहानी टळली आहे.
शहर परिसरासह पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार अनेक दिवसांपासून सुरु आहे. यवतेश्वरपासून कासपर्यंतच्या परिसरात तर मुसळधार पाऊस सुरु असून या परिसरातील डोंगर-कडे कोसळू लागले आहेत. यवतेश्वर घाटाचे रुंदीकरण करताना डोंगराच्या बाजूचा भाग तासून काढून रस्ता वाढविलेला आहे. या तासलेल्या डोंगराची माती ढिली झाली असल्याने आता ती कोसळू लागलेली आहे. बुधवारी येथील दरड झाडांसह रस्त्यावर आली. रस्त्याच्या अगदी मध्यभागी ही दरड कोसळली. सुदैवाने येथून कुणी जात-येत नसल्याने जीवितहानी झाली नाही.