सातारा : आज सकाळी भुईंज गावच्या हद्दीत मुंबईकडे निघालेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत समजलेली माहिती अशी, आज सकाळी 11:00 वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूर आगाराची कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेली शिवशाही बस क्र. एमएच 06 बीडब्ल्यू 3523 ने भुईंज गावच्या हद्दीत अचानक पेट घेतला. बस पेटत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. त्यामुळे फार मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी भुईंज पोलिसांनी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.