पुण्यात पिकअप चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडले 

जागीच मृत्यू 

by Team Satara Today | published on : 09 September 2024


पुणे : पुण्यात एक पिकअप चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत 4 ते 5 वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. ही घटना रविवारी (08 सप्टेंबर) रात्री 11 वाजता ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मनसे (MNS) पदाधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातात श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा भीषण अपघात घडला आहे. चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत करिश्मा चौकातील गाड्यांना धडक देत जात होता. त्यावेळी तो करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. आशिष पवारने दारुच्या नशेत टेम्पो त्यांच्या अंगावर घातला. यामध्ये गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

अपघाताचा हा थरार तेथील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला आणि त्यांनी धाव घेत टेम्पो थांबवून आरोपी ड्रायव्हर आशिष याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अलंकार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अमित शाह यांनी बैठकीत महायुतीतील नेत्यांना चांगलेच खडसावले
पुढील बातमी
भाजपला शरद पवारांचा आणखी एक मोठा धक्का 

संबंधित बातम्या