मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने जात असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. या महामार्गावर रोजचे येणे-जाणे असेल तर मग ही बातमी वाचाच. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आगामी 6 महिन्यांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. हा महामार्ग जड, अवजड, प्रवासी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. अर्थात हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही. तर त्याचा एक भाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामुळे वाहतूक कोंडीची भीती आहे. वेळेत मुंबईत पोहचण्यासाठी तुम्हाला पर्यायी मार्ग माहिती असणे आवश्यक आहे.
मीडिया वृत्तानुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर एक नवीन उड्डापुल आणि एक भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे त्यातील एक भाग पुढील 6 महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRDC) कळंबोली सर्कल येथे नवीन फ्लाईओव्हर आणि अंडरपास तयार करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमुळे कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल. वाहतूक अडथळा दूर होईल.
मीडिया वृत्तानुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा एक भाग हा दि. 11 फेब्रुवारीपासून पुढील जवळपास 6 महिने बंद असेल. अर्थात हा एक्सप्रेसवे हा पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा पनवेल येथे मुंबईकडे जाणाराच रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मग पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने जाणारी पनवेल, गोवा आणि जवाहर लाल नेहरु पोर्ट ट्रस्ट कडून जाणारी सर्व वाहनं ही कोनफाटा ते NH48 कडून जातील. ही सर्व वाहनं पुढे पलास्पे सर्कल येथून त्यांच्या गंतव्य स्थानाकडे जातील.
पुणे ते मुंबई आणि तळोजा, शिळफाटा, कल्याणकडे जाणारी सर्व वाहनं ही पनवेल-सायन हायवेवर 1.2 किमी सरळ जाऊन पुरुषोत्तम पेट्रोल पंप उड्डाणपुलाच्या खालून रोडपली आणि NH48 ने पुढे जातील.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा देशातील पहिला 6 मार्गिकेचा महामार्ग आहे. तो जवळपास 94.5 किमी लांब आहे. मुंबई-पुणेमधील दळणवळणाचा कालावधी या महामार्गाने जवळपास 2 ते 2.5 तासाने कमी झाला आहे. 2002 मध्ये हा एक्सप्रेसवे सर्वांसाठी खुला करण्यात आला होता.