विंटेज कार प्रदर्शनाला खासदार उदयनराजे यांची भेट; कार रॅलीला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 27 January 2026


सातारा  : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित विंटेज कार रॅलीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.रोअर मस्टँग प्रीमियर पद्मिनी, डिझेल अँबेसेडर अशा विविध प्रकारच्या विंटेज गाड्यांनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले .या विंटेज कार व्हॅलीला स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन या गाड्यांच्या पाहणीचा आणि हाताळणीचा आनंद लुटला.

राजधानी विंटेज एक्स्पो २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य विंटेज कार व बाईक शो ला उपस्थित राहून विविध दुर्मिळ, ऐतिहासिक आणि जपून ठेवलेल्या विंटेज गाड्यांची पाहणी खा उदयनराजे यांनी केली. या विंटेज एक्सपोमध्ये शंभर वर्षांपूर्वीच्या विंटेज बाईक सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या .ऑटोमोबाईल इतिहासाचा समृद्ध वारसा जपणाऱ्या या प्रदर्शनातून जुन्या काळातील अभियांत्रिकी कौशल्य, डिझाईन आणि परंपरेची झलक अनुभवता आली. यावेळी विविध गाड्यांविषयी माहिती घेण्यात आली तसेच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे वारसा, इतिहास आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालत पुढील पिढीपर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित होते.

याप्रसंगी राजधानी विंटेज व्हील्सचे अजिंक्य भोसले, भूमिका रावल, वरद गाढवे, मुस्तफा शेख, सौरभ पवार, गणेश भवर, तन्मय खुर्द, ओम दळवी, प्रज्वल दुदुस्कर, अझर शेख उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यामध्ये एकूण 62 उमेदवारांची माघार; 46 उमेदवार रिंगणात : शिंदे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार
पुढील बातमी
सुशांत मोरे यांच्या आमरण उपोषणाचा इफेक्ट; नांदल येथे अनधिकृत गौण खनिज उत्खननाला दणका ; उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढला कारवाईचा आदेश,

संबंधित बातम्या