संभाजी ब्रिगेडचे गायकवाड यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करा

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयरोजगर संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला यांची मागणी

by Team Satara Today | published on : 23 July 2025


कराड : संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर व त्यामागील सूत्रधारावर कठोर कारवाई करा. अन्यथा राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयरोजगर संघटना आपल्या स्टाईलने जन आंदोलन उभारेल, असे निवेदन कराड तहसीलदार यांना देण्यात आले आहे. 

निवेदन देतेवेळी तहसीलदार यांच्याशी बोलताना जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला म्हणाले, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे सर यांच्या आदेशाने आम्ही आज निवेदन देत आहोत. संभाजी ब्रिगेड सारख्या गेली 28 वर्षे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर काम करणाऱ्या संघटनेची चळवळ मोडीत काढण्याचा कुटिल डाव हा त्या हल्ल्या मागील उद्देश आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. सरकारने आमच्या निवेदनाची दखल घेऊन, योग्य ती कारवाई न केल्यास संघटने कडून आम्ही जन आंदोलन उभारू याची दखल शासनाने व प्रशासनाने घ्यावी. 

निषेध हा शिवद्रोही काळी कृत्य करणाऱ्यांचा झालाच पाहिजे विचारधारा परस्परविरोधी असू शकते, पण म्हणून जीवघेणा हल्ला हा निषेधार्थ आहे. समाज मनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या या संघटने विरोधात अशा प्रकारचा हल्ला करणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा घातच आहे. या घटनेतील प्रमुख आरोपी व त्यांच्या मागील मुख्य सूत्रधार कोण आहे हे जनतेसमोर येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच त्यांच्यावर कठोर शासन करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे, या आरोपींना मोक्का सारख्या कायद्याने कारवाई करणे अपेक्षित आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इमरान मुल्ला कराड तालुका मार्गदर्शक राकेश पवार, कराड तालुका अध्यक्ष सचिन भिसे, कराड तालुका कार्याध्यक्ष सागर लादे,  कराड शहराध्यक्ष विकी शहा, कराड शहर उपाध्यक्ष पंकज मगर, कराड शहर कार्याध्यक्ष साजिद मुल्ला उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस
पुढील बातमी
हल्लेखोराच्या हल्ल्यातून शाळकरी मुलीची सुटका करणारे युवक हेच समाजाचे खरे हिरो : श्री. राजेंद्र चोरगे

संबंधित बातम्या