कामेश कांबळे मित्र समूह नगराध्यक्ष चषकाचा मानकरी; 27,111 रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले : सिद्धिविनायक ग्रुपला उपविजेतेपदाचा मान

by Team Satara Today | published on : 16 February 2026


सातारा : शाहूपुरीतील ध्रुव प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित हा पीच टर्फ टेनिस बॉल स्पर्धेमध्ये कामेश कांबळे मित्र समूहाने अजिंक्यपदाचा तर सिद्धिविनायक ग्रुपने उपविजेते पदाचा मान पटकावला .जनसेवा मित्रमंडळाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. विजेत्या संघांना रोख पारितोषिके करंडक आणि प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात आली.

ध्रुव प्रतिष्ठानचे नितीन तरडे यांच्यावतीने या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन झाले एकूण 32 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.

दि. 15 फेब्रुवारी रोजी या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पाडला. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम नगरसेवक अक्षय जाधव विश्वतेज बालगुडे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. बांधकाम व्यावसायिक तुषार जोशी, कळंबे विकास सेवा सोसायटी चेअरमन रमेश  इंदलकर, व्यावसायिक वसंत शिंदे, उद्योजक शाम छाबडा, मनोज ओसवाल, निशांत केंडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्ञानेश्वरी येडे व तेजस दुरुस्त कर यांनी समालोचन केले पंच म्हणून शकीब शेख व शरीफ बागवान यांनी कामगिरी पार पाडली .




या 32 संघांमध्ये कामेश कांबळे मित्र समूहाच्या संघाने अंतिम सामन्यात सिद्धिविनायक सातारा या संघाचा पराभव करून 27 हजार 111 रुपयांचे रोग पारितोषिक पटकावले .शेवटचा अंतिम सामना प्रचंड अटीतटीचा झाला. सर्व उपस्थित प्रेक्षकांनी या रोमांचक सामन्याचा आनंद लुटला. अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ अक्षय जाधव मित्रपरिवाराच्यावतीने आभार मानण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऐतिहासिक कागदपत्रातून उलगडला कुंभारे घराण्याचा इतिहास; सव्वा तीनशे वर्षांपूर्वीच्या अस्सल कागदांवर छत्रपती शाहू महाराजांची मुद्रा
पुढील बातमी
दगा फटका टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे सदस्य बैठकीनंतर परराज्यात रवाना; नेत्यांची जोरदार मोर्चे बांधणी

संबंधित बातम्या