सातारा : अपघात करुन कारचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेवाडी ता.सातारा येथे महामार्गावर ट्रक व कारचा अपघात झाला. याप्रकरणी अनिकेत विष्णू गवळी (वय 28, रा. बसाप्पाची वाडी ता.सातारा) यांनी संतोष हरिकरण रोलिया (वय 54, रा. मध्यप्रदेश) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 30 डिसेंबर रोजी घडली आहे. अपघातमध्ये कारचे नुकसान झाले आहे.