सदरबझार परिसरातील पार्किंगमधून दुचाकी लंपास; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 09 June 2026


सातारा : सदरबझार परिसरातील एका निवासी इमारतीच्या पार्किंगमधून अ‍ॅक्टिव्हा दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकृष्ण गणपतराव माने यांनी आपली दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र नंतर ती तेथून गायब झाल्याचे आढळून आले. सुमारे २० हजार रुपये किंमतीची ही दुचाकी चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार कणसे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उद्यान परिसरात अंमली पदार्थाचे सेवन; युवकाविरोधात सातारा शहर पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
म्हसवे परिसरात संशयास्पद फिरणारा युवक ताब्यात; घरफोडीची साधने जप्त

संबंधित बातम्या