बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात वाघोलीमध्ये ६ शेळ्या ठार; घटनेमुळे परिसरात खळबळ

by Team Satara Today | published on : 04 June 2026


कोरेगाव : वाघोली, ता. कोरेगाव येथे गावठाणापासून जवळ असलेल्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून सहा शेळ्या ठार केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शेळ्यांवरील जखमांवरून हा हल्ला बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वाघोली येथील शेतकरी संजय भोईटे यांच्या वाघोली-विद्यानगर मार्गालगत असलेल्या गोठ्यात सहा शेळ्या व एक म्हैस बांधली होती. बुधवारी सकाळी संजय भोईटे हे गोठ्यात गेले असता सर्व सहा शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. 

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या सुरेखा जगदाळे तसेच वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व पाहणी केली. वाघोली व परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा असून नागरिकांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. वाघोली परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. ग्रामस्थांकडून याबाबत तक्रारी यापूर्वीही करण्‍यात आल्‍या होत्‍या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोल्हापुरात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू
पुढील बातमी
सुरवडीमध्ये भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले; दोन अज्ञात युवकांवर गुन्हा

संबंधित बातम्या