मुंबई : मुख्यमंत्री दरे गावातून परतल्यावर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार का असा सवाल आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले. मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही. 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्रिपदी कोण असणार याबाबत अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक झाली होती. यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केलं होतं का?, याचा विचार देखील मंत्रिपद देताना विचारत घेतलं जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती समोर आली आहे.
मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल, तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं?, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता?, महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला?, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का?, या मुद्यांचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावलं आहे. आज महायुतीचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री किती असणार कोण कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही. महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना ती लांबलेली आहे. सत्तास्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहे. त्याचसोबत महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादीने आपापले गटनेते जाहीर केलेत. मात्र अजूनही भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडलीय. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |

एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |