सातारा : 51 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाचा व्हॉलिबॉल संघ प्रतिनिधित्व करत होता. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा पोलीस व्हॉलिबॉल संघाने अजिंक्यपद कायम ठेवून आठव्यांदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
या स्पर्धेमध्ये कर्णधार विजय साळुंखे, उपकर्णधार कपिल टिकोळे, खेळाडू अमोल चव्हाण, अजय जाधव, सुहास चव्हाण, सागर सजगने, योगेश जाधव, रवी गुरव, पद्मसेन घोरपडे, चेतन गोसावी, प्रवीण पोळ सहभागी होते.
या संघाला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनानुसार स.पो.नि अभिजित यादव तसेच सातारा जिल्हा क्रीडा प्रमुख संकपाळ यांनी व्हॉलिबॉल संघास प्रोत्साहन देत मार्गदर्शनपर सूचना केल्या.