सातारा : सातारा शहरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरल्याबाबतच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्केट यार्ड येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीसी 7839 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 9 एप्रिल रोजी घडली आहे. याप्रकरणी किरण राजाराम आगलावे (वय 42, रा. जांब ता.कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसरी दुचाकी चोरी सिव्हील हॉस्पिटल परिसरात झाली आहे. वैभव वसंत जाधव (वय 40, रा. झरेवाडी ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 9 एप्रिल रोजी घडली आहे. अज्ञात चोरट्याने एमएच 11 एएस 5266 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली आहे.