सातारा शहरातील तांदूळआळी परिसरात दोन वाईन शॉप फोडून ८ लाखांवर डल्ला

by Team Satara Today | published on : 05 April 2026


सातारा : सातारा शहरातील तांदूळआळी परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत दोन वाईन शॉप फोडून ८ लाख १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याबाबतचा गुन्हा शाहुपूरी पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ३ रोजी रात्री ते ४ एप्रिलच्या पहाटे दरम्यान ही चोरी झाली. ओम गणेश वाडक याच्या फिर्यादीनुसार तांदूळ आळी येेथ सरोज वाईन्स नावाचे दारुचे दुकान आहे. त्या दारूच्या दुकानात चोरट्यांनी तिजोरी व काउंटरच्या ड्राव्हरमधील १0 हजा रुपये मागील काउंटच्या ड्रॉव्हरमधील १५ हजार रुपये, तसेच चारुदत्त सुभाष बागल याच्या राधिका वाईन या दारुच्या दुकानतील पुढच्या काउंटरच्या कप्यातील ३0 हजार रुपये असा सुमारे ८ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डेरे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुढील बातमी
मंत्री मकरंद पाटील यांचा पाठपुराव्यामुळे वाई तालुक्यात ‘जललक्ष्मी’ योजनेचे काम प्रगतिपथावर; 23 गावांमधील शेतीला मिळतोय लाभ

संबंधित बातम्या