अपघात प्रकरणी महिला कार चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 30 August 2025


सातारा : अपघातात दुचाकी चालकास जखमी केल्याप्रकरणी महिला कार चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट कॉलनी गोडोली परिसरात महेश मोहन कुंदप रा. रामाचा गोट, सातारा हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून सातारा-रहिमतपूर रस्त्याने जात असताना चारचाकी क्र. एमएच 12 पीएन 8113 वरील महिला कार चालकाने कार भरधाव वेगात चालवून कुंदप चालवीत असलेल्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कुंदप हे जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

संबंधित बातम्या