नेले येथे 2 लाख 58 हजारांची घरफोडी

by Team Satara Today | published on : 23 March 2025


सातारा : नेले येथे अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 58 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुनील चंद्रकांत जाधव राहणार नेले तालुका सातारा यांच्या मधुबन या बंगल्याचे कुलूप तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटे उचकटून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एक मोबाईल असा दोन लाख 58 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कार अपघातात चालकाचा मृत्यू
पुढील बातमी
70 हजार रुपये किंमतीच्या ॲल्युमिनियम कंडक्टरची चोरी

संबंधित बातम्या