पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले 

by Team Satara Today | published on : 24 August 2024


पुणे : पुण्यात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. पुणे जिल्ह्यात पाऊस कोसळत असताना ही घटना घडली. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप असल्याची एसपींची माहिती. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुंबईच्या ग्लोबल कंपनीच हे हेलिकॅाप्टर होतं. मुंबईहून विजयवाडाला हे हेलिकॅाप्टर चाललं होते. पायलट आणि तीन प्रवासी या हेलिकॉप्टरमध्ये होते. AW 139 या हेलिकॉप्टरच नाव आहे. आनंद या हेलिकॉप्टरचे कॅप्टन होते. ते जखमी झाले आहेत. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे : दिर भाटिया (प्रकृती स्थिर) ,अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर), एस पी राम (प्रकृती स्थिर)

सदर हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबादला चाललं होते. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीच हे हेलिकॉप्टर होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दीर्घ आणि आनंदी आयुष्य कसे मिळवायचे?
पुढील बातमी
नारी शक्तीचा सन्मान आणि आदर झालाच पाहिजे : भारतीय जनता पार्टी

संबंधित बातम्या